बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाण्याच्या राजकारणात कायम चर्चेत राहणारे आणि नेहमीच वेगळेपण जपणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत! यावेळी कारण ठरले आहे त्यांची नवी झकास ‘डिफेंडर’ कार! काही तासांपूर्वीच संजूभाऊंनी तब्बल १.५० कोटी ते २ कोटी किंमतीची लँड रोव्हर कंपनीची ‘डिफेंडर’ कार विकत घेतली असून, ती सध्या शहरात चर्चेचा मुख्य विषय बनली आहे!
ही ‘डिफेंडर’ कार म्हणजे लक्झरी, पॉवर आणि सुरक्षा यांचा संगम मानला जातो. अत्यंत मजबूत, दमदार इंजिन असलेली ही गाडी बुलेटप्रूफ आहे, तसेच पाण्यातूनही चालू शकते! म्हणजेच खऱ्या अर्थाने ‘डिफेंडर’ तिच्या नावाला साजेशी! बुलढाण्यात ही गाडी प्रथमच दाखल झाल्याने नागरिकांमध्ये गाडी पाहण्यासाठी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, या नव्या गाडीचा नंबरही लक्षवेधी आहे — “3132”. संजूभाऊंनी स्वतः हा नंबर निवडला असून, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि ओळखीला साजेसा ‘रॉयल टच’ यात दिसतो. मागील काही वर्षांत माजी आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे हे ‘डिफेंडर’ गाडीमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाले होते. पण आता, संजूभाऊंच्या एंट्रीनंतर ही ‘डिफेंडर’ पुन्हा चर्चेत आली आहे — आणि यावेळी चर्चेचा सूर पूर्णपणे वेगळा आहे!
आमदार संजय गायकवाड यांचा राजकीय प्रवासही ‘ॲम्बेसिडर’ ते ‘डिफेंडर’ असा भव्य परिवर्तनाचा आहे. संघर्षातून उभे राहून दोन वेळा आमदार बनलेले संजूभाऊ आता ‘डिफेंडर’सारख्या दमदार गाडीचे मालक झाले आहेत. त्यांच्या समर्थकांसाठी ही केवळ गाडी नाही, तर संजूभाऊंच्या मेहनतीचा आणि आत्मविश्वासाचा प्रतीक आहे.बुलढाण्याच्या रस्त्यावर ही ‘डिफेंडर’ धावताना दिसल्यावर एक गोष्ट मात्र नक्की — संजूभाऊंच्या स्टाईलसमोर ट्रोलर्सही आता सॅल्यूट करतील!














