spot_img
spot_img

💥BREAKING शिक्षकाच्या मृत्यूने चिखलीत खळबळ – आत्महत्या की काहीतरी वेगळं?

चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) शहरातील सहारा पार्क परिसरात आज सकाळी उघडकीस आलेल्या घटनेने संपूर्ण चिखली हादरली आहे! स्थानिक शिक्षक रामदास भास्करराव पडघान यांचा मृतदेह त्यांच्या घरामागील विहिरीत तरंगताना आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पडघान सरांच्या या मृत्यूमुळे संशयाचे वादळ उठले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पडघान सर हे चिखलीतील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. मागील दोन दिवसांपासून ते घरून बेपत्ता असल्याने कुटुंबीय व नातेवाईकांनी शोधमोहीम सुरू केली होती. मात्र, सर्वत्र शोधूनही ते सापडत नव्हते. अखेर आज सकाळी त्यांच्या स्वतःच्या घरामागील विहिरीत त्यांचा मृतदेह दिसताच परिसरात आरडाओरड सुरू झाली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनामा करण्यात आला आणि तो शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. आत्महत्या की काहीतरी वेगळं? हा प्रश्न सध्या स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान, पडघान सर हे स्वभावाने मनमिळाऊ व लोकप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे विद्यार्थी, सहकारी शिक्षक व परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून या घटनेचा उलगडा लवकरच होण्याची अपेक्षा आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!