चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) बॅग लिप्टींग करणारे मध्यप्रदेशातील 2 आरोपी चिखली डि बी पथकाच्या जाळ्यात अडकले आहेत.हिंमाशु कुमेरसिंग छायल वय २४ वर्ष, रीहान सिंकदर सिसोदिया वय १९ वर्षे दोन्ही राहणार कडीया पो.स्टे. पिपडीया, जिल्हा राजगड राज्य मध्य प्रदेश असे आरोपींचे नाव आहे.
याबाबत हकीकत अशी की,१५ ऑक्टोंबर रोजी फीर्यादी मयुर प्रभुलाल पाराशर, रा. संभाजी नगर चिखली यांनी पोलीस स्टेशनला येवुन रिपोर्ट दिला की, ते दिनांक १५ ऑक्टोंबर २०२५ रोजी दुपारी अंदाजे १.३० वाजता सुमारास त्यांना दिवाळी निमीत्त सामान खरेदी करण्यासाठी त्यांची स्पेल्डर प्रो मोटारसायकल क्रमांक एम एच २८ ए. एम ६२३१ च्या डीक्की मध्ये १०००० रुपयांची कापडी पिशवी ठेवली. त्यांनतर फिर्यादी व त्याचा मित्र हे मोटारसायकल राधा टी सेंटर समोर उभी करून तळघरात हॉटेल मध्ये चाहा घेवुन परत आले असता फिर्यादीचे मोटारसायकल जवळ अंदाजे १९ ते २१ वयोगटातील निळया रंगाची हाप टी शर्ट घातलेल्या वर्णनाचा इसम हा मोटारसायकलच्या डीक्की मधुन १०,००० रूपये ठेवलेली पिशवी काढुन रोड वर काही अंतरावर उभे असलेल्या काळया रंगाची लाल पटटा असलेली विना क्रंमाकाची मोटार सायकलवर बसुन मोटारसायकल चालक इसमा सोबत सिध्द सायन्स चौका कडे जाताना दिसुन आले. त्यावेळी फिर्यादीने त्याच्या मित्रासह मोटारसायकलची डीक्की उघडुन पाहणी केली असता डिक्की मधील १०,००० रूपये ठेवलेली कापडाची पिशवी दिसुन आली नाही. त्यांनतर लगेच पैसे चोरी करणाऱ्या इसमाचा पाठलाग करत जात असताना सिध्द सायन्स चौक येथे पोलीसांना घटनेची माहिती देवून पोलीसांसह चोरी करणाऱ्या इसमाचा शोध घेतला असता दोन इसम हे मोटारसायकलवर फौजी हॉटेलच्या पुढे काही अंतरावर दिसुन आले. त्यावेळी पोहेकॉ गजानन काकडे व पोना अमोल गवई यांनी पकडुन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव हिंमाशु कुमेरसिंग छायल वय २४ वर्ष, रीहान सिंकदर सिसोदिया वय १९ वर्षे दोन्ही राहणार कडीया पो.स्टे. पिपडीया, जिल्हा राजगड राज्य मध्य प्रदेश असे सांगितले. यावरुन सदर इसमाना विचारपुस केली असता ते उडवा उडवीचे उत्तर देत असल्याने त्यांना चौकशीकामी ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. फिर्यादीने घटनेची तक्रार दिल्यावरुन पोलीस स्टेशन चिखली अप क्रं ८०९/२५ कलम ३०३(२), ३(५) भा.न्याय संहीता प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपास डि बी पथकाचे सफौ राजेंद्र काळे याचेकडे देण्यात आला. सदर गुन्हयाचे अनुषगांने ठाणेदार पो.नि. संग्राम पाटील यांनी डि.बी. पथक यांना गुन्हयासंदर्भाने सखोल तपास करण्याचे सुचना दिल्या सदर गुन्हयाचा कसुन तपास केला असता आरोपी अशा प्रकाचे गुन्हे करण्याचे सवयीचे असुन त्यानी गुन्हयाची कबुली दिल्याने आरोपी यांना गुन्हयात अटक करुन गुन्हयात चोरी गेलेला मुद्देमाल १०००० रुपये तसेच गुन्हयात वापरलेली मोसा एस पी होंडा कि. ९०००० असा एकुण १००००० रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक निलेश तांबे साहेब बुलडाणा, अपर पोलीस अधिक्षक अमोल गायकवाड साहेब बुलडाणा, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील बुलडाणा यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. संग्राम पाटील, डि.बी. पथकाचे परीपोउपनि समाधान वडणे, सफौ राजेंद्र काळे, पोना अमोल गवई व, पोकॉ. प्रशांत धंदर, पोका अजय इटावा, पंढरीनाथ मिसाळ, राहुल पायघन, विशाल वायाळ, गजानन काकडे यांनी केली आहे.










