spot_img
spot_img

माशांचा रस्त्यावर सडाच सडा! – मासे वाहतूक करणारी बोलेरो पिकअप पलटी! – प्रवासी किरकोळ जखमी!

चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल)  शहरातील खामगाव नाक्यावर आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली! हैदराबादहून पहूर, जळगावच्या दिशेने मास्यांची खेप घेऊन निघालेला बोलेरो पिकअप अचानक अनियंत्रित होऊन उलटला. वाहनात मोठ्या प्रमाणात मासे भरलेले असल्याने काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, बोलेरो पिकअप अतिवेगात जात असताना अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले. भीषण आवाजाने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. क्षणभरात मोठी गर्दी झाली आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. त्यांनी वाहनातील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले आणि रस्त्यावर पडलेला साठा व मलबा हटवून वाहतूक सुरळीत केली.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहनचालक आणि सोबतचे प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले.या घटनेमुळे काही वेळ वाहतूक खोळंबली असली तरी स्थानिकांच्या वेळेवरच्या मदतीमुळे मोठा अपघात आणि संभाव्य जीवितहानी टळली. चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक पुन्हा सुरळीत केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!