spot_img
spot_img

💥BREAKING ‘चार विद्यार्थ्यांच्या सिनेस्टाईल अपहरणाचा डाव फसला!’

मलकापूर (हॅलो बुलढाणा) शहरात गुन्हेगारी वाढत चालली असून काल रात्री धुपेश्वर मंदीर परिसरात एका तरुणाचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाला तर आज शहरात सकाळी चार विद्यार्थ्यांचे सिनेस्टाईल एका गाडीत अपहरण करून पोबारा केल्याची खळबळजनक घटना समोर आली. परंतू आरोपीचा हा डाव पोलीसाच्या सतर्कतेमुळे फसला आहे.अपहरणाच्या या धक्कादायक घटनेने पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी सुमारे आठ वाजता गांधी चौक परिसरातून एक 14 वर्षीय मुलगी आणि तीन शालेय मुलांचे अपहरण केल्याची घटना समोर आली. प्राप्त माहितीनुसार, लाल रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून हे सर्व मुलं-मुली पळवून नेण्यात आले होते. ही कार संशयास्पदरीत्या मोताळा रोडवरील मिर्झा हाऊस परिसरात दिसल्याने ट्राफिक पोलीस अंमलदार मंगेश पवार यांनी तत्परता दाखवत कारला अडवले.

पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. कारमधून पळवून नेलेली मुलगी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत असल्याने तिला तत्काळ डॉ. महाजन यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्याकडून पुढील तपास सुरू आहे. अपहरणाचा हेतू काय होता, कारमधील व्यक्ती कोण होते आणि त्यांनी ही कार कुठून आणली याचा शोध पोलीस घेत आहेत.या प्रकारामुळे शहरात आणि आसपासच्या भागात पालकवर्गात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले असून,नागरिकांनी आपल्या मुलांवर विशेष लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!