spot_img
spot_img

💥मर्डर! मलकापूरची शांतता भंगली! धारदार शस्त्रांनी सतीशचा निर्घृण खून!

मलकापूर (हॅलो बुलडाणा/ रविंद्र गव्हाळे) विदर्भाच्या प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर शहरात बुधवारी रात्री घडलेल्या एका सिनेमा स्टाईल हल्ल्याने परिसर थरारला! किरकोळ कारणावरून बेधुंद टोळीने धारदार शस्त्राने दोन तरुणांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात सतीश गजानन झाल्टे (रा. धुपेश्वर) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सोबती अविनाश जितेंद्र झाल्टे गंभीर जखमी झाला आहे. धुपेश्वर परिसरातील पुलावर घडलेली ही घटना मलकापूरच्या शांततेला तडा देणारी ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश आणि अविनाश यांच्यात आरोपींसोबत काही तासांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. त्याच वादाचा राग मनात धरून आरोपींनी पुलावर दोघांना गाठले आणि सशस्त्र टोळक्याने सपासप वार करून सतीशचा खून केला. अविनाश जखमी अवस्थेतून कसाबसा पळाला आणि गावकऱ्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी जळगावला हलवले.

चौघे आरोपी जेरबंद
या धक्कादायक प्रकरणात दसरखेड पोलिसांनी तत्परता दाखवत चार आरोपींना अटक केली आहे. देवा ठाकुर, संकेत पालवे, सौरभ पालवे आणि अरविंद उर्फ गब्बर सोळंके अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी काही जण सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.घटनेनंतर उपजिल्हा रुग्णालयात मृत सतीशच्या नातेवाईकांचा ओरड-आक्रोश सुरू झाला होता. पोलिस निरीक्षक हेमराज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून खुनामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र या रक्तरंजित हत्येमुळे मलकापूर पुन्हा एकदा हादरले आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!