बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महिला आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली.15 प्रभागात 30 नगरसेवक राहतील. यापैकी 15 नगरसेविका राहणार असून, यंदा नगर पालिकेवर लाडकींची सत्ता पाहायला मिळणार आहे. पण आज महिला आरक्षण सोडतील नीलम आकाश दळवी ही एकच महिला उपस्थित होती त्यामुळे महिलांची अनास्था अधोरेखित झाली आहे.
आज नगर परिषदेच्या सभागृहात महिला आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली.15 प्रभाग आहे.30 नगरसेवक राहणार असून यापैकी 15 नगरसेविका राहतील.
नगराध्यक्ष पद महिलांसाठी आरक्षित झाल्याने निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक महिलांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.असे असले तरी आज महिला आरक्षण सोडत प्रक्रियेवेळी केवळ नीलम आकाश दळवी ही एकच महिला उपस्थित होती.या संदर्भात त्यांची उत्सुकता जाणून घेतली असता, त्या म्हणाला की, महिलांना 50 टक्के आरक्षण आहे.मला पहायचे होते की,कोणत्या वार्डा कशा पद्धतीने आरक्षण देतात.बुलढाण्याचा विकास किती टक्के पर्यंत महिलाकडे जातो.माझे पती आकाश दळवी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून वार्डा वार्डात समाजकार्य करीत आहे त्यांची ही धडपड मी बघत असते.यातूनच मलाही प्रेरणा मिळाली.निवडणूक लढविण्यासाठी मी देखील इच्छुक आहे.आता बुलढाणा चा विकास नारीशक्तीच्या हातात असून या विकासात मला योगदान द्यायचे असेही नीलम दळवी म्हणाल्या.