spot_img
spot_img

मेहकरात शिवसेनेची गर्जना – शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर सेना! आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले शेतकऱ्यांवरील अन्याय अजिबात खपून घेणार नाही!

मेहकर (हॅलो बुलढाणा) माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज मेहकर तालुक्यात शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी जोरदार एल्गार पुकारला. मेहकर उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन मेहकर–लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

या वेळी उपजिल्हा प्रमुख प्रा. आशिष रहाटे, तालुका प्रमुख निंबाजी पांडव, तालुका समन्वयक डॉ. नंदकिशोर गारोळे, शहर प्रमुख किशोर गारोळे, ॲड. आकाश घोडे, पौर्णिमा गवई, नगमा गवळी, रमेशबापू देशमुख, ॲड. संदीप गवई, गोपाल गायकवाड, श्याम पाटील, अमोल बोरे, ऋषिकेश जगताप, पवन टाले, दीपक गायकवाड, संतोष लाड, प्रणित भिसे यांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी देण्यात आलेल्या या निवेदनात चार ठोस मागण्या करण्यात आल्या
1️⃣ तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा.
2️⃣ शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून 7/12 कोरे करावे.
3️⃣ थकित वीजबिलांची माफी करावी.
4️⃣ प्रति हेक्टर ५०,००० रुपये नुकसानभरपाई द्यावी.

या मागण्यांची तात्काळ पूर्तता न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. “शेतकरी हा आपल्या राज्याचा कणा आहे, आणि त्या कण्यावर अन्याय होऊ देणार नाही,” असा इशारा आमदार खरात यांनी दिला. मेहकरात शिवसैनिकांच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले असून, शासनाच्या कारभारावर संतप्त शेतकऱ्यांचा रोष स्पष्टपणे उमटला आहे. या आंदोलनामुळे मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले गेले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!