बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्हा पोलीस दलाकडून 800 किलो 646 ग्रॅम गांजा नष्ट करण्यात आला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून 26 जून पासून अंमली पदार्थ विरोधी अभियान ‘मिशन परिवर्तन’सुरू करण्यात आले. त्या अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला गुन्हे नोंद करून गुन्ह्यातील प्राप्त मुद्देमाल जप्त करण्यात आला. महासंचालक मुंबई यांच्या आदेशाने व विशेष पोलीस महानिरीक्षक अंमली पदार्थ विरोधी फोर्स मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली 16 जुन ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत अंमली पदार्थ संबंधित गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला मुद्देमाल नष्ट करण्या बाबतची विशेष मोहीम राबविण्यात आली होती.याअनुषंगाने 16 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीतील केंद्रीय गोडाऊन मध्ये संकलित असलेल्या गांजाची कायदेशीर विल्हेवाट लावण्याबाबत प्रक्रिया करण्यात आली.सर्वोच्च न्यायालयांच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे एनडीपीएस कायद्याखालील 11 गुन्ह्यातील 800 किलो 646 ग्रॅम गांजा नष्ट करणे आवश्यक असल्याचे प्रक्रिये दरम्यान दिसून आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची रीतसर परवानगी घेऊन त्यांनी प्राधिकृत केलेल्या महाराष्ट्र इनविरो पावर लिमिटेड बुट्टीबोरी डिस्टिक नागपूर या ठिकाणी जिल्हास्तरीय ड्रग डिस्पोजल समिती सदस्य अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड,
पोलीस उपअधीक्षक गृह तथा समिती सदस्य बाळकृष्ण पावरा,पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर,स्थानिक गुन्हे शाखा, प्रशांत म्हस्के एमईपीएल बुट्टीबोरी युनिट प्रमुख आणि दोन शासकीय पंच यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील 11 गुन्ह्यांमध्ये हस्तगत करण्यात आलेला गांजा नष्ट करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने करण्यात आली.