spot_img
spot_img

सौदामिनींचा सन्मान!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महावितरण सारख्या अत्यंत धोका असलेल्या क्षेत्रातही पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिला यशस्वीपणे काम करत आहेत.याचा महावितरणला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांनी केले.

विद्युत भवन येथ ” सन्मान सौदामिनिचा,या नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात महावितरणमधील महिला कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाचा,कलागुणांचा गौरव करण्यात आला.यावेळी कार्यकारी अभियंता बद्रीनाथ जायभाय, मंगलसिंग चव्हाण सह विद्युत भवनातील सौदामिनी यांची प्रमुख उपस्थिती बोती.

यावेळी बोलतांना श्री कटके म्हणाले की,चुल आणि मुल सांभाळणे हीच ओळख असलेल्या स्त्रीने केवळ आपल्या कर्तृत्वार स्वत:ची यशीस्वी आणि सशक्त स्त्री म्हणून नविन ओळख निर्माण करून यशाचे शिखर गाठले आहे,म्हणूनच स्त्रीला भारतीय संस्कृतित आदीशक्ती मानले आहे. नवरात्र उत्सवानिमित्त महावितरणमधील स्त्री शक्तीचा गौरव करण्याचा उपक्रम निश्चितच आगामी काळातील अनेक प्रसंगांना सक्षमपणे हातळण्याचा ऊर्जा देईल असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उपव्यवस्थापक श्रीमती मुळे आणि श्रीमती सरमोकादम यांनी आपले अनुभव कथन केले आणि महावितरण प्रशासनाने सन्मान सौदामिनीच्या उपक्रमातून केलेल्या सन्मानाबद्दल आभारही व्यक्त केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!