धामणगाव बढे (हॅलो बुलढाणा) गावातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि गुन्हेगारीला कायमचा आळा घालण्याच्या उद्देशाने, धामणगाव बढे येथे महत्त्वाच्या रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गावातील व्यापारी बांधवांनी एकत्र येत वर्गणी गोळा करून हा अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘सुरक्षा प्रकल्प’ यशस्वी केला आहे.
या सुरक्षा प्रणालीमुळे गावात आता सीसीटीव्हीचे ‘सुरक्षा कवच’ तयार झाले असून, यामुळे गुन्हेगारीवर वचक बसण्यास मोठी मदत होणार आहे. चोरी, मारामारी किंवा इतर कोणत्याही गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांना यामुळे बळ मिळणार आहे, परिणामी गावाची सुरक्षा अधिक मजबूत होईल आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढेल
हा सुरक्षा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी गावातील सर्व व्यापारी मंडळींनी पुढाकार घेतला. या व्यापारी बांधवांनी गोळा केलेल्या वर्गणीनंतर, धामणगाव बढेचे ठाणेदार नागेश जायले यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पूर्ण झाला. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्याला ठाणेदार नागेश जायले, धनराज महाजन आणि चंचल कुमार गोठी यांच्यासह धामणगाव बढेचे सरपंच मोहन सपकाळ यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी धामणगाव बढे येथील ग्रामस्थांनी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष केतन मोधे, उपाध्यक्ष मुकुंदा शिरसागर, सचिव एकनाथ किन्होळकर यांच्यासह सर्व सदस्य राहुल महाजन,अजिंक्य जाधव,विष्णू घोंगडे, शुभम बढे , हाफिस सादिक , गणेश घोंगडे, मुक्तार शाह फिरोज शहा आणि अजिज खाटीक सह सर्वे वयापारी संघटना चे सदस्य गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.