धामणगाव बढे (हॅलो बुलढाणा) दिव्यांगाना स्वनिधीतुन उत्पन्नाचे पाच टक्के निधी वाटप करा,अशी मागणी सरपंच,सचिवांनी केली आहे.दिव्यांगाना ग्रामपंचायत स्वनिधीतुन उत्पन्नाचे पाच टक्के निधी देणे बाबत ग्रामपंचायत सदस्य यांनी अर्ज केला की, मागील अनेक वर्षापासून ग्रामपंचायत उत्पन्नातून दिव्यां गाना कोणत्याही प्रकारची निधी वाटप केलेली नाही. साहित्य वाटप करण्यात आले नाही. हा दिव्यांगावर एक प्रकारे अन्याय झाल्याचे दिसून येत आहे दिव्यांगांना तात्काळ ज्या वर्षापासून आपण ग्रामपंचायत स्वनिधी
दिव्यांगाना पाच टक्के निधी वाटप केलेले नाही. त्या वर्षापासून आज पर्यंत आपल्या ग्रामपंचायत चे उत्पन्नातील पाच टक्के निधी दिव्यांगाना देण्यात यावा, दिव्यांगावर आपल्याकडून अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी,अशी मागणी नियोजन करण्यात आली आहे.निवेदन देताना ग्रां.पं.सदस्य पती अलीम कुरेशी. ग्रां.पं. सदस्य.हाफीस सादीक. ग्रां पं.जमीर.कुरेशी हे सर्वजण उपस्थित होते.