डोणगाव (हॅलो बुलढाणा) येथील वार्ड क्रमांक दोन मधील शासकीय अंगणवाडीची इमारत शेवटच्या घटका मोजत आहे.सन 2018 -19 मध्ये बांधलेल्या या इमारतीला अद्यापही उद्घाटनाची प्रतीक्षा आहे.
अंगणवाडी हे ग्रामीण माता व बाल संगोपन केंद्र आहे. 3 ते 6 वयोगटातील मुलांचे पूर्व-प्राथमिक शिक्षण,आरोग्य, पोषण आणि कुपोषण यावर लक्ष केंद्रित करणे असा अंगणवाडीचा उद्देश आहे, यामध्ये गर्भवती आणि स्तनदा मातांना आरोग्य व आहाराबाबत मार्गदर्शन केल्या जाते. या केंद्रात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत असतात. परंतू डोणगावच्या वार्ड क्रं 2 मधील अंगणवाडीची इमारत लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आली.यामध्ये ठेकेदाराने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी कमिशनखोरी केल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.गेल्या सात वर्षापासून ही इमारत पांढरा हत्ती ठरली आहे.या अंगणवाडी केंद्राची घंटा केव्हा वाजणार? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.