बुलढाणा (हॅलो बुलढाणा) एका धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस 3 महिने सश्रम कारावासाची शिक्षा अन् दहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
बुलढाणा येथील रहिवासी व फिर्यादी मीना
मनोज अग्रवाल यांच्या मालकीची मौजे. पोहरा पूर्णानगर ता. भातुकली, जि.अमरावती येथील गट क्र.47 मध्ये 0 हे 81 आर क्षेत्रफळाची वडीलोपार्जीत शेतजमीन होती. त्यांनी सदर शेतजमीन विक्रीचा व्यवहार आरोपी प्रशांत
सुधाकरराव पाटील. रा. आसेगाव पूर्णा, ता. चांदूर बाजार, जि. अमरावती यांच्यासोबत केला होता. आरोपीने खरेदीचा मोबदला अंशतः रोख रक्कम देऊन व उर्वरित रक्कम धनादेशाद्वारे प्रदान करण्याचे कबुल केले होते. परंतु धनादेशाचा अनादर झाल्याने फिर्यादी यांनी बुलढाणा येथील न्यायालयात ॲड.
अजय दिनोदे यांच्यामार्फत फिर्याद दाखल केली होती. सदर प्रकरणात न्यायालयाने लेखी फिर्याद, पुरावे व फिर्यादी तर्फे ॲडव्होकेट यांचा युक्तिवाद ग्राह्य पकडून आरोपीस दोषी धरले व 3 महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा तथा रक्कम 10 लाख रुपये दंड ठोठावून, दंडाची रक्कम फिर्यादीस देण्याचे आदेशित केले आहे. फिर्यादी तर्फे ॲड. अजय दिनोदे यांना ॲड. रोहित दिनोदे, ॲड. अबुजर अन्सारी व अँड. प्रियेश चौधरी यांनी सहकार्य केले.