spot_img
spot_img

दुसऱ्या वर्षीचा ‘हॅलो बुलढाणा’ गरबा महोत्सव बुलढाणेकरांच्या हृदयात कोरला! बुलढाणेकर रंगले रास-गरबाच्या रंगी! वेशभूषा, नृत्याची कमाल… महिला-तरुणींची तूफानी धमाल!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) नवरात्रीच्या अखेरच्या माळेला बुलढाण्यातील विष्णू वाडी येथील राजे लॉन गरबाच्या रंगांनी उजळून निघाले. ‘हॅलो बुलढाणा’ व ‘कायस्थ कॅटर्स अँड इव्हेंट मॅनेजमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या वर्षीचा गरबा महोत्सव थाटात पार पडला. आदिशक्तीच्या जागरासोबतच परंपरा आणि संस्कृतीची जपणूक हा महोत्सवाचा मुख्य हेतू होता.

पहिल्या माळेपासूनच महिला व तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध वेशभूषांमध्ये नृत्यकला सादर केली. रंगीबेरंगी पोशाख, सडसडीत नृत्याचे ठसे आणि भक्तिमय वातावरणामुळे कार्यक्रम अधिक आकर्षक ठरला. शेवटच्या माळेलाही सहभागी कलाकारांनी आपले कलागुण सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.या सोहळ्यात जिल्ह्यतील शहरातील नामांकित उद्योजक, लोकप्रतिनिधी व अधिकारी मान्यवरांनी नवमीचे ९ दिवस उपस्थित राहून आयोजकांचे कौतुक केले. हा कार्यक्रम संस्कृती आणि सर्जनशीलतेचा सुंदर मिलाफ आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. शेवटच्या माळेनिमित्त वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही, सायकल, साउंड बार यांसारखी आकर्षक बंपर विविध बक्षिसे सहभागी विजेत्यांना प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष तथा मा.आमदार विजयराज शिंदे, जिजाऊ बँकेचे उपाध्यक्ष शिवाजीराव तायडे व अर्धांगिनी, मराठा अर्बनचे श्रीकृष्ण जेऊघाले व अर्धांगिनी, माजी नगरसेवक आकाश दळवी व अर्धांगिनी, एडवोकेट शरद राखोंडे, हॅलो बुलढाणा संपादक जितूभाऊ कायस्थ, कायस्थ कॅटर्स संचालक राजेंद्र कायस्थ सर्व परीक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालनाची जबाबदारी संजीवनी आठराळे व अमोल पाटील यांनी पार पाडली. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी गरबा समितीतील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले
परंपरा, नृत्यकला, भक्तीभाव आणि आनंद यांचा सुंदर संगम असलेला हा गरबा महोत्सव बुलढाणेकरांच्या हृदयात अविस्मरणीय ठसा उमटवून गेला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!