जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत ही मोठी ग्रामपंचायत असताना, सुनगाव ग्रामपंचायतच्या स्मशानभूमीची झालेली दुरावस्था झालीय. याकडे ग्रामपंचायत सुनगाव प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे. या स्मशानभूमीचे टीनपत्रे हे तुटलेले उडालेले असून दोन ते तीन वर्षापासून ही दुरावस्था आहे. त्यामुळे सुनगाव येथील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी येथे ऊन वारा पाऊस यांचा सामना करावा लागत आहे. या स्मशानभूमीची दुरावस्था पाहता यावर एकही टिन पत्रा हा व्यवस्थित राहिलेला नाही. याकडे ग्रामपंचायत लक्ष केव्हा देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.स्मशानभूमीची दुरुस्ती हे तात्काळ सूनगाव ग्रामपंचायतने करावी, अशी सूनगाव येथील नागरिकांची मागणी आहे.
- Hellobuldana