बुलढाणा (हॅलो बुलढाणा) चोरींचे प्रमाण एवढे वाढले की, जिल्ह्यात रोज कुठे ना कुठे चोरी होत आहे. पोलीस रात्रीची पेट्रोलिंग करतात की नाही ? हा प्रश्नच आहे. स्वामी समर्थ नगर, सागवन बुलढाणा येथे तब्बल 53 हजार रुपयांचा ऐवज कपाटातून लंपास करण्यात आला.
निर्मला किशोर पानझाडे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. पानझाडे हे कुटुंबासह राहतात. ते वाढदिवसानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. रात्री आल्यावर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. दरम्यान कपाटातील ठेवलेले दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. कपाटातील सोन्याचे दागिने मिळून 53 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे पोलीस मात्र चोरट्यांचा शोध घेणार तरी कधी असा प्रश्न पानझाडे यांना पडला आहे.