बुलडाणा (हॅलो बुलडाणा) बुलडाण्यातील जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहाच्या घड्याळ टॉवरवर दोन तरुण आज थेट चढून आंदोलनाला सुरुवात केली. ही घटना अचानक घडल्याने जिल्हा परिषदेच्या आवारात प्रचंड गोंधळ उडाला आहे. पोलिस व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. आंदोलनकर्त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे मात्र अद्याप उघड झालेले नाही.
काही दिवसांपूर्वीच बीएसएनएलच्या टॉवरवर चढून एका तरुणाने आपला संताप व्यक्त केला होता. त्या घटनेनंतर पोलिसांनी टॉवरभोवती सुरक्षा कठडे उभारले होते. मात्र आता टॉवर वीरांनी जिल्हा परिषदेचा टॉवर गाठल्याने सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रशासन सततच्या अशा आंदोलनांमुळे धास्तावलेले दिसत आहे.
आता नेमके हे आंदोलन कोणत्या मागणीसाठी आहे? जिल्हा प्रशासन व शासनापर्यंत आपला आवाज पोहोचवण्यासाठीच का अशी टोकाची भूमिका घेतली जात आहे? या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत जिल्हा परिषदेच्या टॉवरसमोरील तणाव वाढत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चर्चेचे प्रयत्न सुरू केले आहेत










