बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मित्रांगण परिवार आयोजित व कोठारी होंडा प्रायोजित, कवन प्रस्तुत ‘अक्षर अक्षर तुझेच आहे’ या स्वरचित गझल व कवितांची बहरदार मैफल रविवारी 5 ऑक्टोबरला एडेट हायस्कूच्या प्रांगणावर संपन्न होणार आहे.
मराठी गझलेच्या मंदिरात छोटीशी पणती प्रज्वलित करण्याचा हा मित्रांगण परिवाराकडून केलेला प्रयत्न आहे. मित्रांगणा च्या अनेक काव्यमैफलीची अनेक वेळा बुलढाणेकरांनी अनुभूती घेतली. यावर्षी सुद्धा काव्य रसिकांना मित्रांगण परिवारासोबत महाराष्ट्रभर तुफान गाजलेल्या कवींच्या कार्यक्रमासह मराठी गझलांची कोजागिरी साजरी करायची आहे.या कार्यक्रमाला प्रवेश शुल्क नाही.या बहरदार गझल कार्यक्रमात प्रामुख्याने अपूर्व,नैनेश,
अविनाश,सारंग हे कविता सादर करतील. राग यांचे संगीत संयोजन असणार आहे.या काव्यमैफलीचा लाभ घ्यावा,असे आवाहन चंद्रशेखर जोशी,नरेंद्र राजपूत,आनंद संचेती, डॉ. राजेश्वर उबरहंडे, डॉ.आशिष खासबागे,कमलेश कोठारी, मनोज बुरड, रणजीतसिंग राजपूत,विकी चव्हाण, रितेश खडके,अभिजीत निंबाळकर, सुनीता जोशी आदींनी केले आहे.