spot_img
spot_img

बुलढाणेकर रंगले रास गरबा च्या रंगी! – ‘वेशभूषा,नृत्याची कमाल…महिला, तरुणींची तूफान धमाल!’ – आ. सिद्धार्थ खरात म्हणाले… ‘संस्कृती आणि सर्जनशीलतेचा एक सुंदर मिलाफ!’

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आदिशक्तीचा जागर करीत,महिला व तरुणींचा सर्वांगीण विकास साधावा तसेच परंपरा व संस्कृतीची जपणूक व्हावी, या उद्देशाने ‘हॅलो बुलढाणा’ व कायस्थ कॅटर्स अँड इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित विष्णू वाडीतील राजे लॉन मधील गरबा महोत्सव सध्या धूम करीत आहे. मातेच्या सहाव्या माळेला मेहकर- लोणार मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ खरात आणि इतर मान्यवरांनी महोत्सवाला भेट देऊन आयोजकांची प्रशंसा केली.

‘हा कार्यक्रम संस्कृती आणि सर्जनशीलतेचा एक सुंदर मिलाफ आहे’,असे आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले.’हॅलो बुलढाणा’ व कायस्थ कॅटर्स अँड इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित गरबा महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे.

या गरबा उत्सवात गरबाच खेळला जात नाही तर, सांस्कृतिक महत्त्व देखील समजून घेतल्या जाते.या कार्यक्रमात पहिल्या माळे पासून मोठ्या संख्येने महिला व तरुणींनी सहभाग नोंदवत विविध वेशभूषा धारण करून गरबा नृत्याने उपस्थितांना भूरळ पाडली. साहाव्या माळेलाही आपले कलागुण सादर करत या रंगतदार व भक्तिमय कार्यक्रमाला अधिक आकर्षक बनविले.यावेळी
जिल्ह्यातील लोकप्रिय असलेले उबाठाचे मेहकर मतदार संघाचे अभ्यासू आमदार सिद्धार्थ खरात, मेहकर शिवसेना शहर प्रमुख किशोर गारोळे, मेहकर तालुका प्रमुख निंबाजी पांडव,कायस्थ कॅटर्सचे संचालक राजेंद्र कायस्थ, माजी नगरसेवक आकाश दळवी, बुलढाण्यातील प्रतिष्ठित उद्योजक हरीश भाऊ खंडेलवाल सपत्नीक,अमोल गिरी सपत्नीक सुविधा व्यवस्थापक जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा या मान्यवरांनी गरबा महोत्सवाची अनुभूती घेत प्रशंसा केली.हा गरबा सांस्कृतिक, अध्यात्मिक मूल्ये जपणारा ठरत असून, बुलढाणेकर रंगले रास गरबा मध्ये रंगल्याचे उत्साहात्मक चित्र आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!