बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नांदुरा तालुक्यातील निमगाव तालुक्यात दोन तरुणांचा ज्ञानगंगा नदीत बुडाल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत असताना मलकापूर तालुक्यात सुद्धा दोन मुले व्याग्रा नदीत पोहण्यासाठी गेले असता मृत झाल्याची माहिती जिल्हा नैसर्गिक आपत्ती विभागाकडून देण्यात आली आहे.
आज 28 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास मलकापूर तालुक्यातील व्याग्रा नदी मध्ये पोहताना निबोरी जवळ सोहम वासुदेव सोनोने वय अंदाजे 16 रा. दसरखेड, ता. मलकापूर जिल्हा बुलढाणा व
शुभम राजू दवंगे वय अंदाजे 15 रा. दसरखेड ता. मलकापूर जिल्हा बुलढाणा ही दोन मुले पाण्यात पोहताना बुडाले आहेत. एक मुलगा सापडला तर दुसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे. नांदुऱ्यातील घटने पाठोपाठ मलकापूर तालुक्यात सुद्धा दोन मुले वाहून होण्यासाठी मृत झाल्याचा अंदाज आहे.बचाव पथकाचे शोध कार्य सुरू आहे.