नांदुरा (हॅलो बुलडाणा/ निलेश पाटील) तालुक्यातील निमगाव येथे आज हृदयद्रावक घटना घडली. ज्ञानगंगा नदीत दोन तरुण – करण भुमरे (वय 18) आणि वैभव फुके (वय 19) – बुडले असून अद्याप त्यांना बाहेर काढता आलेनांदुरा ले नाही. घटना समोर येताच प्रशासन, पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असून, पावसामुळे नदीची पातळी वाढल्यामुळे शोधकार्य कठीण झाले आहे. घटनास्थळी हळहळ व्यक्त केली जात आहे, गावकरी संताप व शोककळा व्यक्त करत आहेत.स्थानिक प्रशासनाने तातडीने प्रभावी कारवाई करण्याचे आवाहन केले असून, सुरक्षित अंतर राखण्यास देखील सांगितले आहे. या घटनेने परिसरातील वातावरण गंभीर झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यातील जलसाठा आणि नदीच्या ओघामुळे अशा घटना पुन्हा होऊ शकतात. गावकरी आणि प्रशासन एकत्र येऊन या दोन निरागस तरुणांचा शोध सुरू ठेवलेला आहे, पण अद्याप कोणतीही निश्चित माहिती मिळालेली नाही.










