spot_img
spot_img

💥’ये दुनिया है कालाबाजार.. ‘ये पैसा बोलता है!’ – सरकारी धान्याची लूट!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) पैशांसाठी वाटेल ते प्रकार सुरू आहेत. सरकारी धांन्याची लूट होत असून, जळगाव जामोद तालुक्यात कुरणगाड येथे मोठ्या प्रमाणात राशनचा तांदूळ एलसीबी च्या पथकाने जप्त केला आहे.या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली असून जळगाव जामोद पुरवठा विभागाचे अधिकारीही तातडीने घटनास्थळी दाखल झालेत.

रेशनचा तांदूळ गरीब आणि गरजू लोकांसाठी सरकारद्वारे अनुदानित दरात उपलब्ध करून दिला जातो. हा तांदूळ काळ्या बाजारात विकला जात असताना, पकडला गेला आहे.अनेकदा रेशन दुकानदारांकडून किंवा इतर व्यक्तींकडून या तांदळाचा गैरवापर केला जातो आणि तो जास्त दराने विकला जातो, काही ठिकाणी रेशनचा तांदूळ एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा देशात तस्करी करण्याच्या उद्देशाने नेताना पकडला जातो.
जळगाव जामोद तालुक्यात कुरणगाड येथे मोठ्या प्रमाणात राशनचा तांदूळ जप्त करण्यात आला असून एलसीबी अर्थात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कारवाई करत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!