बुलढाणा (हॅलो बुलढाणा) संत चोखासागर अर्थात खडकपूर्णा (जिल्ह्यातील मोठ्या) प्रकल्पाच्या आज 28 सप्टेंबर रोजी हवामान खात्या कडून प्राप्त सुचनेनुसार खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुख्यता जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफ्राबाद व छत्रपती संभाजीनगर सिल्लोड या क्षेत्रात मुसळधार पाऊसाची शक्यता सांगितली आहे.त्यानुसार सदर क्षेत्रातून प्राप्त माहिती अन्वये छत्रपती संभाजी नगर जिह्यातील सिल्लोड तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे.
अश्या स्थितीत पाऊसामुळे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे. करिता जलाशय परीचन सूची नुसार प्रकल्पाचा पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी नदीपत्रात सोडण्यात येत असलेल्या विसर्गात वाढ करण्याची आवश्यकता पडणार आहे. त्यामुळे खडकपूर्णा नदी काठच्या गावांतील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे.नदी पत्रात गुरे, लहान मुलं, व कोणी मासेमारी तथा नदी पात्रातून वाहतूक करू नये.करिता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.