spot_img
spot_img

वादग्रस्त जिल्हा उपनिबंधक डॉ.लोखंडेंची उचलबांगळी! – लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली होती कारवाई! – कर्तव्यदक्ष गितेशचंद्र सावळेंनी घेतला प्रभार!

बुलढाणा/अकोला (हॅलो बुलढाणा) कर्तव्या संदर्भात दक्षपणाचे धडे देणारे येथील गितेशचंद्र सावळे यांची अकोला जिल्हा उपनिबंधक पदी प्रभारी म्हणून बदली झाली आहे. आधी ते बुलढाणा नंतर वाशिम आणि आता अकोला येथे ते सहकारी संस्थेची धुरा सांभाळणार आहेत.याला कारण असे की,कायम वादग्रस्त राहिलेले डॉ. प्रविण लोखंडे यांची अकोला जिल्हा उपनिबंधक पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्यातील उमरी येथील डॉ. प्रवीण लोखंडे यांनी जिल्हा उपनिबंधक पदावर कार्यरत असताना अनेक वाद घातले. विशेष म्हणजे अमरावती व अकोला येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर कारवाई केली असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.दरम्यान
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडतांना
होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम,
२००५ च्या कलम ४ मधील तरतुदी नुसार सहकार विभागातील प्रशासकीय कारणास्तव कर्तव्यदक्ष गितेशचंद्र सावळे यांची बदलीने नियुक्ती आता अकोला येथील सहकारी संस्थेत
उपनिबंधक म्हणून झाली आहे.त्यांचे बुलढाणा, वाशिम येथील कार्य कर्तव्य नागरिकांच्या पसंतीस उतरले होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!