spot_img
spot_img

मोताळ्यात धनगर समाजाच्या मोर्चात वज्रमुठ! – एसटी प्रवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी!

मोताळा (हॅलो बुलढाणा) एसटी प्रवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी मोताळा तालुका सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने मोर्चा काढून तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.

सदर निवेदनात नमूद केले आहे की, धनगर समाज हा वाड्यावर वस्तीवर राहुन भटकंती करणारा समाज आहे. या समाजाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत 36 नंबरला आरक्षण दिले आहे.मात्र सरकारने याची अद्याप पर्यंत अंमलबजावणी केली नसल्यामुळे हा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे लवकरात लवकर एसटी प्रवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करून तात्काळ धनगर समाजाला आरक्षण लागू करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे.सदर निवेदनावर गोपाल काटे,रमेश धुनके, रामभाऊ शिंगाडे,शांताराम वाघ,संदीप सहावे,रामेश्वर काळंगे,एकनाथ आयनार,चंदन मार्कड,मांगो मार्कड लहू सुरळकर,अंबादास चाटे,भागवत पाटील,गजानन धनके l,मंगेश मोरे,राजू सावळे,सुरेश मोरे ,मोहन बाजोडे शिवदास सहावे,विजय खोंदले,देवदास पाचपोर, सुधाकर सुषिर,पुंजाजी खोदले,अमित वसतकार,संजय कासे,अनिल धूनके,संतोष वसतकार,अनंता सोनाग्रे,निलेश पाचपोर,राजेंद्र वैतकार,मनोहर खोंदले,विठ्ठल सुशीर,एकनाथ सहावे, सुनील गोमकर यांच्यासह अनेक समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!