बुलढाणा (हॅलो बुलडाणा) पोलीस मुख्यालयातील महिला अधिकाऱ्यावर SBI बँकेतून तब्बल 10,17,000 रुपये फसवून घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पोलीस कर्मचारी नापोकॉ. संतोष तुकाराम धंदर यांनी केलेल्या तक्रारीनुसार, LHC 517 दीपमाला उंबरकर यांनी स्वतःच्या SBI खात्यात त्यांची रक्कम ट्रान्सफर करून घेतली.
तक्रारदार संतोष धंदर यांनी सांगितले की, सप्टेंबर 2023 मध्ये दीपमाला उंबरकर यांनी कॅन्सरग्रस्त भावाच्या उपचारासाठी पैसे मागितले. मानवतेच्या भावनेने त्यांनी SBI बँकेतून लोन काढून दिला, मात्र महिला कर्मचारीनी मोबाइल आणि YONO APP चा वापर करून आपले खाते भरून घेतले. 22/09/2023 ते 19/10/2023 दरम्यान एकूण 10,17,000 रुपये फसवणूक करून घेतल्याचा दिलेल्या तक्रारीत आरोप आहे.
तक्रारीनंतर बुलढाणा पोलिसांनी कलम 420,406 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तपासासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल दतात्रय नागरे आणि पोलीस उपनिरीक्षक साळुंके यांना नेमण्यात आले आहे. तक्रारदार संतोष धंदर यांनी सांगितले की,पैसे न मिळाल्यामुळे त्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत असून मुलांच्या शिक्षण,घरखर्च व लोन हफ्ता भरणे कठीण झाले आहे.
पोलीस प्रशासनाने आता या गंभीर प्रकरणाचा तातडीने खुलासा करणे गरजेचे आहे, जेणेकरून पोलीस दलातील विश्वासार्हतेला धक्का बसू नये.










