बुलढाणा (हॅलो बुलडाणा) एकेकाळी जिल्ह्यातील अवैध धंद्यावाल्यांना रस्त्याने पळवून पळवून मारणारी ‘दबंग’ पोलीस अधिकारी श्वेता खेडकर उद्या बुलढाण्यात धडकणार आहे. पिंपरी-चिंचवड पुणे येथील पोलीस उपायुक्त असलेल्या खेडकर मॅडम यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे पूर्णपणे बंद करून खाकीच्या धाकाची ताकद जिल्हा वासियांना दाखवून दिली होती.
याच पार्श्वभूमीवर शिवशाही युनिव्हर्सल मध्ये उद्या सकाळी ८ वाजता ‘कॉफी विथ पोलीस उपायुक्त’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात शिवशाही युनिव्हर्सचे विद्यार्थी श्वेता खेळकर यांच्याशी थेट संवाद साधणार आहेत. विविध प्रश्नांच्या माध्यमातून विद्यार्थी उपायुक्त यांना बोलवणार असून, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, पर्यावरण प्रेमी आणि राजकीय मंडळींना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
दुपारी विधवा विवाह सोहळा आयोजित आहे. नवरात्र उत्सवानिमित्त मानस फाउंडेशनच्या माध्यमातून एकल आणि विधवा महिलांसाठी विवाह योग जुळवण्यात आले आहेत. अनेक विधवा महिला त्यांच्या भावी जीवनसाथीसोबत रेशीमगाठ बांधणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवशाही परिवाराचे संस्थापक डॉ. वसंतराव चिंचोले तर प्रमुख अतिथी म्हणून श्वेता खेळकर व बुलढाणा एएसपी अमोल गायकवाड उपस्थित राहणार आहेत.