spot_img
spot_img

💥EXCLUSIVE तब्बल 67 ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सिईओंचा दणका! – लेखापरिक्षणाचा अभिलेख उपलब्धच केला नाही! – एक वेतन वाढ तात्पुरत्या स्वरूपात बंद.. 25 हजार रुपये दंड!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायती पैकी 67 ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी यांनी केलेल्या खर्चाचे लेखापरिक्षण करण्यासाठी अभिलेख उपलब्ध करून न दिल्याने त्यांना दोषी मानून एक वेतन वाढ तात्पुरत्या स्वरूपात बंद व 25 हजार रुपये दंडाची कार्यवाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात ८७० ग्रामपंचायती असुन ग्रामपंचायतींनी केलेल्या खर्चाचे लेखा परिक्षण दरवर्षी सहायक संचालक, स्थानिक निधी लेखा परिक्षा, बुलढाणा यांच्या कार्यालयाकडुन करण्यात येते. सन 2022-23 व 2023-24
मध्ये 870 ग्रामपंचायतींचे लेखा परिक्षण करण्यासाठी लेखापरिक्षणचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यावेळी सन 2022-23
मध्ये 41 ग्रामपंचायतींनी लेखापरिक्षणास अभिलेखे उपलब्ध करुन दिले नाही. तसेच सन 2023-24 मध्ये 20 ग्रामपंचायतींनी लेखापरिक्षणास अभिलेखे उपलब्ध करुन दिले नाही.या बाबतीत जिल्हास्तरावर वेळोवेळी संबधित ग्रामपंचायत अधिकारी यांना पत्रव्यहार करुनही लेखा परिक्षण केलेले नाही. संबधित ग्रामपंचायतचे लेखापरिक्षण करण्यासाठी अभिलेखे उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांची असल्याने त्यांनी कर्तव्यात कसुर केलेला आहे. लेखा परिक्षणास अभिलेखे उपलब्ध करुन न दिलेल्या दोषी ग्रामपंचायत अधिकारी यांचेवर मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी प्रत्येकी 25000 हजार रुपयांची शासन निर्णयान्वये दंडांत्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा (सेवा व शिस्त) अपिल नियम 1964 चे कलम 5 अन्वये असलेल्या अधिकाराचा वापर करुन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 67 ग्रामपंचायत अधिकारी यांची एक वेतन वाढ तात्पुरत्या स्वरूपात बंद व 25000 रुपये दंडाची कार्यवाही करण्यात आली आहे.

▪️कार्यवाही झालेली ग्रामपंचायत अधिकारी यांची तालुका निहाय संख्या!

बुलढाणा 8,चिखली 1, देऊळगाव राजा 2,सिंदखेड राजा 11, लोणार 1, मेहकर 4, खामगाव 15, शेगाव 2, जळगाव जामोद 7, संग्रामपूर 8, मलकापूर 5, मोताळा 3 अशा एकुण 67 ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!