सिंदखेड लपाली (हॅलो बुलढाणा) अतिवृष्टीमुळे शेतातील रस्त्यांची वाट बिकट झाली आहे.शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने ग्रामीण भागात गावांच्या रस्त्यांची वाट लागली आहे.परंतु यावर यंत्रणेने रस्ते सुरळीत केले नाही.हाच गाव रस्त्याचा प्रश्न रेटत सिंदखेड लपाली येथे सरपंच प्रवीण आप्पा कदम यांनी चिखलातच खूर्ची टाकून उपोषण छेडले आहे.
शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी उपलब्ध असलेला गाव रस्ता, आणि त्या रस्त्याची झालेली दुरावस्था याकडे प्रशासनानी लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी यासाठी सरपंच आप्पा भाऊ कदम यांनी तीन दिवसापूर्वी संबंधित जिल्हा प्रशासनाला संबंधित परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी लेखी निवेदन दिले होते. मात्र मागणीची दखल न घेतल्यामुळे आज पासून त्यांनी उपोषणास सुरुवात केली आहे.या गावाचा रस्ता खड्ड्यात हरपला आहे.
जागोजागी मोठ मोठे खड्डे व रस्त्याच्या आजूबाजूला काट्याची झुडपे वाढल्यामुळे वाट ही अरुंद झाली आहे. या रोडवर दुचाक्या घसरून पडणे, अवजड वाहने रस्त्याच्या खाली उतरणे, टायर फुटून गाडीचे नियंत्रण सुटणे अशा छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना सतत घडत आहेत. त्यामुळे गावातील विकास पुरुष समजले जाणारे सरपंच प्रवीण आप्पा कदम यांनी चिखलातच खूर्ची टाकून उपोषण छेडले आहे.