spot_img
spot_img

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करा! – राज ठाकरेंचे समर्थक काय म्हणतात?

चिखली (हॅलो बुलढाणा) राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करावी,अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने केली आहे.

राज्यात अतिवृष्टीमुळे जवळपास 50 लाख पेक्षा जास्त हेक्टरवरील पिकांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात 100 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडलेत तर हजारो गुरेढोरेही दगावली आहेत. जमिनी पूर्णपणे खरडून गेल्या आहेत.या सर्व नुकसानी पोटी शासन एनडीआरएफच्या निकशानुसार 30 मे 2025 च्या जीआर नुसार 2 हेक्टर च्या मर्यादेपर्यंतच मदत करणार आहे. त्यानुसार जिरायत शेतीपिकासाठी हेक्टरी 8500 रुपये मदत मिळणार आहे. बागायत शेतीपिकासाठी हेक्टरी 17000 रुपये तर बहुवार्षिक पिकासाठी (फळ पिकासाठी) हेक्टरी 22 हजार 500 रुपये मदत मिळणार आहे. परंतु ही मदत अतिशय तोकडी आहे. या मदतीमुळे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी अवस्था शेतकऱ्यांची होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या प्रचंड बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना पंचनाम्यांच्या फेऱ्यात न अडकवता त्यांना तात्काळ भरीव मदत मिळावी यासाठी मनसेच्या 22 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, मनसे बुलढाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढे, मनसे नांदुरा तालुकाध्यक्ष भागवत उगले, मोताळा तालुकाध्यक्ष अमोल गोरे,तालुका सचिव प्रवीण देशमुख , चिखली शहर अध्यक्ष नारायण बापू देशमुख,उपतालुकाध्यक्ष संजय दळवी, संदीप नरवाडे , अविनाश सुरडकर, आशिष गायके, मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अंकित इंगळे,गणेश जाधव, अर्जुन पाटील, ऋषिकेश पाटील सागर इंगळे ,अंकुश बरंडवाल,शुभम जाधव ,नितीन गायकवाड ,धीरज सुरडकर,वैभव जाधव ,सागर खरे,तुषार दांडगे ,सूरज गोफणे,समाधान राऊत, वैभव उबाळे, मोहन भोरे यांसह असंख्य मनसे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!