spot_img
spot_img

💥थरार ! दोघांच्या प्रेमाचा थरारक अंत!

खामगाव (हॅलो बुलढाणा) प्रेमात कोण काय करील सांगता येत नाही.. शहरालगतच्या साजनपूरी जुगनू धाब्यावर प्रेमीयुगलांचा खून झाल्याची थरारक घटना आज सायंकाळी समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून दोघांनी एकमेकांवर वार केले आणि निपचित पडले. त्यांचे वय 18 ते 22 होते.

सदर युवक -युवती बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील असल्याची माहिती आहे. मागील अनेक वर्षांपासून दोघे प्रेम प्रकरणात अडकलेले होते.
दोघांच्या भांडणात तिसरा ही उपस्थित असल्याची शंका व्यक्त केली जातेय. साहिल उर्फ सोनू राजपूत आणि पायल पवार अशी मृतकांची नावे आहेत. खामगावात प्रियकर आणि प्रेयसीची हत्या झाल्याची घटना आज सायंकाळी समोर आली. जूगनू धाब्यावर दोघांनी एकमेकाला संपविले.यावेळी मोठा लोकांचा जमाव झाला होता.दरम्यान घटनास्थळी खामगाव पोलिस दाखल झाले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!