बुलढाणा (हॅलो बुलढाणा – इसरार देशमुख ) शासनाने आणि विविध संस्थेने वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा ध्यास घेतला असून वृक्ष लागवडीचे आवाहन केले आहे. झाडे लावण्यास अनेक जण इच्छुक आहेत परंतु नगरपालिकेने यात पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
केवळ वृक्षारोपण करून चालत नाही तर वृक्षांचे संवर्धन महत्त्वाचे आहे. त्यामुळे जमाते-ए-इस्लामी हिंद
इकबाल चौक बुलढाणा येथे 100 झाडे व ट्री गार्ड नगरपालिकेने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्र शाखा बुलडाणा अतंर्गत मस्जीद दारुसलाम मिर्झा नगर, हाजी उस्मान प्राथ. शाळा व इदगाह मैदान जुना गांव बुलडाणा या परिसरामध्ये संस्थेने निरोगी पर्यावरण, आरोग्यदायी जिवन या योजने अतंर्गत 100 झाडे लावण्याचे ठरविले आहे. नगरपालिकेने 100 झाडे व ट्री गार्ड उपलब्ध करून द्यावे अशा मागणीचा विनंती अर्ज
अध्यक्ष,हाफिज मुजाहिद कुरेशी जमाते इस्लामी बुलडाणा यांनी मुख्याधिकारी यांना केला आहे.