spot_img
spot_img

💥EXCLUSIVE अपार्टमेंटच्या बेकायदेशीर बांधकामाला ‘क्लिन चीट’ देणाऱ्या सरपंच – सचिवांवर कलम ४२० सह इतर कलम नुसार गुन्हे दाखल!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाचा बुरखा फाडणारी एक खळबळजनक घटना बुलढाण्यात उघडकीस आली आहे. नियम आणि कायद्याला पायदळी तुडवून एका आलिशान अपार्टमेंटच्या बेकायदेशीर बांधकामाला ‘ओके’ म्हणणाऱ्या तत्कालीन सरपंच उषा खैवान आणि सचिव माणिक शेळके यांच्यावर आता थेट कायदेशीर कारवाईचे आदेश धडकले आहेत.

सन 2010 ते 2015 या कालावधीमध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत बांधकाम नियमांची उघडपणे पायमल्ली करून, ही नियमबाह्य परवानगी देण्यात आल्याचे चौकशीत समोर आले आहे. नमूद अटी आणि शर्तींचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, या प्रकरणातील गैरव्यवहार स्पष्ट झाला आहे. त्यामुळेच पोलिसांनी तत्कालीन सरपंच उषा खैवान आणि ग्रामसेवक माणिक शेळके या दोघांवर थेट कलम 420,467, 468,471 (34) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बुलडाणा तालुक्यातील सर्वात मोठी येळगाव,सावळा सुंदरखेड,
माळविहिर व सागवन ग्रामपंचायतीत सरपंचासह सचिवाने केलेले भ्रष्टाचार व नियमबाह्य कामांची पोलखोल देखील होणार असल्याच्या हालचाली दिसून येत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!