बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील श्रद्धा व भक्तीचे केंद्रस्थान असलेल्या कारंजा चौक येथील दुर्गा माता मंदिराचा ऐतिहासिक नवरात्र उत्सव यावर्षी ५२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
२२ सप्टेंबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असुन दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील हा सोहळा भव्यदिव्य स्वरूपात साजरा होत आहे.
नवरात्र महोत्सव काळात रोज सायंकाळी साडेसात वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात येते. आरतीनंतर भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. या उत्सवाला दररोज शेकडो भाविक उपस्थित राहून माता दुर्गेच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करतात. उत्सवाचे वैशिष्ट्य मंदिर समितीच्या पुढाकाराने गेल्या ५२ वर्षांपासून हा उत्सव सातत्याने आयोजित केला जात आहे.
दररोज विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, देवीची पूजा-अर्चा, महाआरती व प्रसाद यांचे आयोजन.नवरात्र महोत्सवामुळे परिसरात भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरण.
स्थानिक नागरिकांसाठी हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम नसून एकात्मता, भक्ती व सामाजिक सलोख्याचे प्रतीक बनला आहे.
२२ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या ५२व्या नवरात्र महोत्सवासाठी कारंजा चौकातील दुर्गा माता मंदिर परिसर सज्ज झाला असून भाविकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सर्व कार्यक्रमांमधे भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहान मंदीर समितीने केले आहे.