बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मयुरी गौरव ठोसर प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या न्यायीक मागणीसाठी आज बुलढाणा शहर नागरिक समन्वय समितीने आक्रोश मार्चा काढला. संगम चौकातील शिवस्मारक येथून काढण्यात आलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकून जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
बुलढाण्याच्या मयुरी बुडुकले हिचा 10 मे रोजी जळगाव खान्देश येथील गौरव ठोसर याच्याशी विवाह झाला होता. मात्र लग्नाच्या चार महिन्यानंतरच मयुरीचा मृत्यू झाला, तिने आत्महत्या केल्याचे सासरकडच्या लोकांकडून दाखवण्याचा प्रयत्न झालाय.. मात्र ही आत्महत्या नसून ती हत्या असल्याच्या भावना माहेर कडील नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत. मयुरीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आज बुलढाणेकरांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्व राजकीय पक्षीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी त्याचबरोबर महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.