बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सलग तीन – चार दिवसांपासून व कालच्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील 5 तालुक्यात ओल्या दुष्काळाची परिस्थिती दिसून येत आहे.15 ते 17 ऑक्टोंबर दरम्यान 58524.34 हेक्टरवरील पिके उध्वस्त झाली होती. कालही 22 सप्टेंबरला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. घरांच्या भिंती खचल्या, पडझड झाली. पशुधन वाहून गेले तर शेतातील विहिरी खचल्यात.तसेच दोघांचा पूरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. शिवाय 62,607 हेक्टरवरील पिके मातीमोल झाल्याचा प्राथमिक अंदाज असून हा आकडा फुगणारा आहे.
मौजे मंत्री तेली ता. बुलडाणा येथील रहीवाशी गजानन मोतीराम परोळे वय 47 वर्ष हे 18 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेपासुन बेपत्ता होते. ते सव नदीच्या पुराच्या पाण्यात वाहुन
गेल्याची शंका व्यक्त झाली होती. 21 सप्टेंबर रोजी सकाळी अंदाजे 11 वाजता
नंदकिशोर पडोळ रा. अंत्री तेली यांच्या गट नं 30 मधील शेताजवळ सदर व्यक्ती मृतावस्थेत आढळली. पैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहत जाऊन त्यांचा मृत्यु झाला.
19 सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे मौजे खंडाळा मकरध्वज येथील नाल्याला अचानक आलेल्या पुराने मौजे खंडाळा मकरध्वज लक्ष्मण रामराव ठेंग, वय 85 वर्षे यांचा पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील बुलढाणा, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, मलकापूर, शेगाव, नांदूरा तालुक्यात पावसाने कहर केल्याने मोठे नुकसान झाले आहे.
जिल्हयातील 4 मंडळात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. नुकसानीची तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिलेत. जिल्ह्यातील पाडळी, सिंदखेडराजा, सोनाशी आणि तुळजापूर या चार मंडळांतर्गत 21 सप्टेंबरच्या रात्री व 22 सप्टेंबर च्या सकाळी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या मंडळ क्षेत्रामध्ये शेतजमिनीचे आणि घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतजमिनीचे कृषी विभाग, महसुल विभाग आणि पिक विमा कंपनीच्या प्रतिनीधी समवेत तात्काळ पंचनामे करण्यासंदर्भात आपल्या स्तरावरुन संबधित विभागांना निर्देशित कराव्यात अशा सुचना जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आल्या आहे.












