बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सततच्या पावसामुळे धरणे ओसंडून वाहत आहेत.पावसामुळे हजारो हेक्टर शेतजमीन पाण्या खाली आली आहे. येळगाव च्या स्वर्गीय भोंडे जलाशयाचे ८० गेट उघडले असून पाण्याचा प्रवाह येळगाव पुलावरून वाहतोय…परिणामी काही काळापासून वाहतूक ठप्प झाली आहे. बुलढाणा चिखली मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे. येथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
▪️धरणाची मुख्य वैशिष्ट्ये!
प्रकार: मातीचा भराव उंची: २४.६० मीटर (सर्वोच्च) लांबी: ४३१० मीटर पाणीसाठा क्षमता: ९३.४३२ दशलक्ष घनमीटर कालवा: २५३ किमी लांबीचा कालवा असून ५२.०९ घनमीटर प्रति सेकंद इतकी क्षमता आहे.काढण्याची यंत्रणा: धरणाला ८० स्वयंचलित गोडबोले द्वारे आहेत.