बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पिक अप ने मोटरसायकल स्वारांना उडाविल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला.
रवि गिरी असे अपघातात ठार झालेलेचे नाव आहे. देऊळघाट रोड कडे जाणाऱ्या 3 दुचाकीस्वारांना पिक अप या वाहनाची धडक बसली.दरम्यान धाड नाका हॉटेल समाधान त्यासमोर हा अपघात झाल्याने यातील एक युवक रवी गिरी रा. दहिंद याचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.पिकअप चा चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती मिळत आहे










