बुलढाणा (हॅलो बुलडाणा) स्थानिक जिजामाता महाविद्यालय बुलढाणा येथील रसायनशास्त्र व वनस्पती शास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी ओझोन थर संरक्षण साठी विविध आकर्षक पोस्टर बनविले व प्रतिकृती प्रदर्शनी आयोजन केले व ओझोन संरक्षण साठी विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली आयोजन यावेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक भित्तिपत्रक प्रदर्शनीद्वारेही ओझोन संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. जगभर १६ सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वासाठी वातावरणातील ओझोन थर हा सतत कार्यरत राहतो. याच थरामुळे घातक अतिनील किरण पृथ्वीवर येऊन सजीवांना अपाय करीत नाहीत. हा थर नष्ट झाला तर सजीव सृष्टीचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते,
ओझोनचा थर वाचला तरच पृथ्वीवरील जीवन सुरक्षित राहील, अन्यथा नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढेल” असा प्रभावी संदेश दिला.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठीतर भित्तिपत्रक प्रदर्शनीसाठी विज्ञान शाखा प्रमुख व रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. संतोष कुंभारे, प्रा .डॉ. आनंद देशपांडे ,प्रा.डॉ. प्रदीप वाघ, प्रा .उमेश वावगे, प्रा श्वेता गिते, प्रा. ऋत्विक राजपूत यांनी मार्गदर्शन केले तसेच नाटिका साठी वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनंत मोरे, डॉ. राहुल उके, प्रा. रेणुका राजपूत व प्रा. शुभांगी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. आयोजनात श्री. धनंजय ताठे , श्री सचिन चव्हाण ,श्री दिलीप मोरे ,श्री. भगवान उबाळे श्री. गजानन सुसर यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश गवई यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी विज्ञान शाखाप्रमुख डॉ.संतोष कुंभारे, कला शाखाप्रमुख डॉ. जे. जे. जाधव, आयक्यूएसी समन्वयक डॉ.सुबोध. एन. चिंचोले डॉ गणेश किरोचे,डॉ. योगेश रोडे, डॉ. नामदेव ढाले, डॉ. विनय पैकीने, डॉ. डी. जे. कांदे, डॉ. राजश्री येवले, प्रा. पवन ठाकरे, प्रा. गजानन लोहटे, डॉ. विकास पहुरकर, प्रा. राम बनकर, प्रा. अभिजित देशमुख, डॉ. खंडारे, प्रा. प्रफुल गायकवाड, प्रा. भोंडे, प्रा. हिवाळे, आदी मान्यवर उपस्थित होते.कनिष्ठ विभागातून प्रा. संभाजी माने, प्रा. पुष्पा वानखेडे, प्रा. रजनी निखाडे, प्रा. पुनसे, प्रा. सुनीता काळवाघे, प्रा. वैशाली मोरे, प्रा. प्रणिता पाटील,प्रा. स्नेहल राऊत व प्रा. नदीम शेख श्री यांनी सहभाग नोंदविला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये ओझोन थर संरक्षणाबाबत जागृती निर्माण झाली असून समाजातही हा संदेश पोहोचावा, हा उद्देश या कार्यक्रमामागे असल्याचे प्राचार्य डॉ. गवई यांनी सांगितले.