बुलढाणा (हॅलो बुलढाणा)दिवसेंदिवस उग्र होत चाललेल्या बेरोजगारीच्या मुद्द्यासह जुनी पेन्शन योजना, नीट व इतर पेपर घोटाळे आणि कमी पट संख्यांच्या शाळा बंद होत असल्याने चिंता व्यक्त करीत पदवीधर मतदार संघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी आज सभागृहाचे लक्ष वेधले.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सध्या सुरू आहे. या निमित्ताने अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धिरज लिंगाडे यांनी विविध ज्वलंत प्रश्नांवर सभागृहामध्ये आवाज उठवत राज्य शासनाचे लक्ष वेधले आहे. यात प्रामुख्याने कृषी मालाला भाव नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याची व्यथा मांडली. गेल्या तीन महिन्यात विदर्भामध्ये 876 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सुशिक्षित युवकांची वाढलेली बेरोजगारी, शेतकरी पुत्रांची होत असलेली निराशा, जुनी पेन्शन योजना, नीट व इतर पेपर घोटाळे, कमी पटसंख्यांच्या शाळा बंद अशा प्रश्नांना त्यांनी सभागृहात वाचा फोडली.