बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘हॅलो बुलढाणा’ व कायस्थ कॅटर्स अँड इव्हेंट मॅनेजमेंट बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने विष्णूवाडी येथील राजे लॉन येथे आयोजित गरबा प्रशिक्षणाला तरुणींचा तुफान प्रतिसाद मिळतोय. प्रशिक्षणाचा दुसरा दिवस असून सातशेच्यावर तरुणींची नाव नोंदणी झालीय.
दरवर्षी आदिशक्तीचा उत्सव अधीक आनंददायी करण्यासाठी गरबा नृत्याचे प्रशिक्षण दिले जाते.नवरात्रीच्या नऊ दिवशीही गुजरातची लोककला असलेल्या आणि स्त्री रूपाचा सन्मान, पूजा आणि उत्सव असलेल्या या गरबा महोत्सवात तरुणी गाण्यांच्या सुरांवर थिरकतात..
आदिशक्तीची उपासना करतात..गरबा महोत्सवात सहभागी होणे हा कलाकारांसाठी वैयक्तिक आनंद असतो..त्यामुळे
‘हॅलो बुलढाणा’ व कायस्थ कॅटर्स अँड इव्हेंट मॅनेजमेंटच्या गरबा महोत्सवाला दरवर्षी उदंड प्रतिसाद मिळतोय.यंदाही गरबा प्रशिक्षणाला सातशेच्यावर तरुणींची नाव नोंदणी झाली असून गरबा नृत्याची धूम सुरु आहे.