spot_img
spot_img

‘लालपरीला’ अडथळा! – म्हणे..आई व वहिनी यांना येऊ द्या! – चालकाला दिला चोप,वाहकाला केली शिवीगाळ!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) लालपरीच्या पंखात अलीकडे बळ आले असताना, या ‘लालपरीला’ काही माथेफिरू आडकाठी आणत असल्याचे प्रकार समोर येत आहे. एकाने दादागिरी करत ‘आई व वहिनी यांना येऊ द्या..म्हणत चालकाला मारहाण करून वाहकाला शिवीगाळ करून बससेवेत अडथळा निर्माण केला.ही घटना पारखेड फाटा ता. मेहकर येथे घडली.

मंगलसिंग भावसिंग जोहरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिल्याने आरोपी तुषार अर्जुन राठोड व त्याच्या आईवर गुन्हा दाखल झालाय.आरोपी
तुषार अर्जुन राठोड याने खामगाव डेपोत चालक या पदावर 10 वर्षा पासुन कार्यरत असलेल्या मंगलसिंग भावसिंग जोहरे यांना मारहाण केली. जोहरे यांची खामगांव ते मेहकर बस क्रमांक MH 20 BL-4173 वर ड्युटी लागली होती. सोबत राजेश भानुदास जाधव वाहक म्हणुन होते. मेहकरकडे जात असतांना दुपारी 1.40 च्या सुमारास ग्राम पारखेड येथे बस प्रवाश्यांना उतरविण्यासाठी थांबली असता, बस मधील प्रवाशी पारखेड बस स्थानकवर उतरुन काही प्रवाशी बस मध्ये चढले. बस पुढे मार्गस्थ होत असतांना अचानक बस पुढे एक काळी टी शर्ट व काळी लोअर पॅन्ट घातलेला इसम हा दोन्ही हात काचावर
ठेवुन उभा राहीला व तो चालकाला म्हणाला की, माझी आई व वहीनी यांना येवु दे.. तेव्हाच बस पुढे घे असे जोर जोरात ओरडुन त्याने गोंधळ घातला होता. चालकाने म्हटले की, तु बस च्या मध्यभागातुन बाजुला हो तर त्याने बाजुला होत नाही म्हणून हुज्जत घातली. माझ्या घरचे येवु दे त्यानंतर मी बाजुला होइल असा म्हणाला. दरम्यान चालक यांनी जवळील
मोबाइलमध्ये त्याचा फोटो काढत असतांना तो पळत आला व बसचा दरवाजा उघडून कॅबीन मध्ये येवुन ‘तु माझा फोटो
का काढतो ?’असे म्हणुन चालकाला शिवीगाळ केली. गणवेशाची कॉलर पकडुन कर्तव्य पार पाडत असतांना चालकाच्या छातीवर व गालावर चापटा बुक्क्यांनी मारहाण केली.बस मधील लोखंडी पत्रा चालकाच्या
डाव्या हाताच्या मनगटावर लागुन चालक जखमी झाला आहे. आरोपी तुषारची आई सुध्दा कॅबीन मध्ये घुसुन तिने सुध्दा लोटपाट करुन सरकारी कामात अडथळा आणाला.चालक जखमी झाल्यावर सुध्दा त्यांची लाथा बुक्याने मारहाण सुरुच होती. दरम्यान सोबत असलेले वाहक राजेश जाधव हे वाद सोडविण्यासाठी आले असता
त्यांनां सुध्दा शिवीगाळ केली. बस मधील प्रवाशी बंटी मोरजानी, रहीम खान, विठठल बघे व इतर प्रवाशी यांनीचालकाच्या तावडीतुन सोडविले.’ तु पुन्हा दिसाला तर तुला जिवाने मारुन टाकील अशी धकमीही आरोपीने दिली असल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!