लोणार (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यातील आदिवासीबहुल भाग तसेच निसर्गाने नटलेल्या लोणार तालुक्यातील टिटवी येथील धबधबा खळखळून वाहू लागलाय.. सध्या जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे, यामुळे अनेक लहान मोठी धरणे भरलीय, त्यात लोणार तालुक्यातील टिटवी येथील धरण ही ओसंडून वाहत असून सांडवा खळाळतोय .. एकप्रकारे त्याचा धबधबा तयार झालाय.. अतिशय निसर्गरम्य वातावरण असल्याने पर्यटकांनी या धबधब्यावर गर्दी केली आहे.
महाराष्ट्रातील कास पठार महाबळेश्वर, खंडाळा, चिखलदरा च्या तोडीस तोड असलेला टिटवी येथील नयनरम्य परिसर आणि त्यातही सौंदर्याची भर पडलेला धबधबा काही दिवसांपासून खळखळून वाहू लागला, त्यामुळे हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे मात्र अशाप्रकारच्या पर्यटन स्थळांचा विकास होणे गरजचे आहे.