बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बिबट्या दिसताच भल्या भल्यांची घाबरगुंडी उडते. गिरडा परिसरात बिबट्याचा संचार वाढल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी वन्यजीव विभागाने बिबट्याला जेरबंद करून शेतकऱ्यांमधील भीती दूर करावी, अशी मागणी होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात असलेल्या जंगलव्याप्त गिरडा परिसरातील भागात बिबट्याचा संचार वाढला असून, आज सकाळी गिरडा परिसरातून जात असताना मोताळा पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना बिबट्या आढळून आला. हा बिबट्या अनेकांना दिसत असून शेतात काम करणाऱ्या मजुरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची स्थानिक शेतकऱ्यांना केली आहे.