spot_img
spot_img

तलाठी विनोद गिरी यांच्या वडिलांचा अपघाती मृत्यू; एस.टी. बसने घेतला बळी!

चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) मेहकर फाटा, चिखली येथे आज सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सायळा (ता. सिंदखेड राजा) येथील गणेश दत्तुगीर गिरी (वय ६०) हे आपल्या मोटारसायकल (बजाज सीटी हंड्रेड क्र. एमएच २८ बीयू ०५९३) वरून चिखलीकडे येत असताना एस.टी. महामंडळाची बस (क्र. एमएच ४० एन ९१३३) याने जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की गणेश गिरी यांचा जागीच मृत्यू झाला.

गणेश गिरी हे चिखली येथील तलाठी विनोद गिरी यांचे वडील असल्याने प्रशासन व स्थानिक नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. अपघाताच्या घटनेनंतर एस.टी. बसचालकावर निष्काळजी वाहनचालना व वेगावर नियंत्रण न ठेवल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे. या मार्गावर वाहतुकीची वाढती कोंडी व निष्काळजी वाहनचालकांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.या धक्कादायक घटनेनंतर नागरिकांकडून मेहकर फाटा परिसरात वेगमर्यादा, वाहतूक पोलिसांची उपस्थिती व कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!