बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा लागत असलेल्या येळगाव धरण शिवारात कोंबडी चोरांनी चक्क कोंबड्यांसह हाती येईल तो मुद्देमाल लंपास केला आहे. या चोरीत कोंबड्यांसह 24 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लुटून नेल्याने चांडक ले आऊट येथील योगेश गुळवे यांनी न्यायीक मागणी केली आहे.
योगेश मोतीराम गुळवे, रा.चांडक ले आउट बुलडाणा यांचे येळगाव धरण शिवारात टिनशेड आहे.टिनशेडमध्ये ठेवलेले 20 फुटाचे 10 लोखंडी अँगल प्रत्येकी 1000 रु प्रमाणे 10,000रु तसेच फॅन किंमत 5000 रु व 30 कोंबड्या प्रत्येकी 300 रु प्रमाणे 9,000 रु असा एकुण 24,000 रुपयांचा मुददेमाल चोरी गेला आहे. फिर्यादीची येळगाव धरण शिवारात 6 एक्कर शेती असुन त्यामध्ये कोंबड्यांचे
पोल्ट्रीफार्म आहेत.कोंबडी चोरांनी इतरही मुद्देमाल लंपास केला असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.