spot_img
spot_img

नगर अभियंत्यावर हल्ला; सरकारी कामात अडथळा – जळगाव जामोदच्या माळीखेलमध्ये धक्कादायक प्रकार!

जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) बुलडाणा जिल्ह्यातील माळीखेल येथे अतिक्रमणाची पाहणी करत असलेल्या नगरपंचायत अधिकाऱ्यावर व रचना सहाय्यकावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना काल गुरुवारी  दुपारी घडली. या हल्ल्यामुळे सरकारी कामकाजात अडथळा निर्माण झाला असून पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

नगरपंचायत जळगाव जामोदच्या बांधकाम विभागातील नगर अभियंता रवी महादेव पारस्वर व रचना सहाय्यक विद्या एकनाथ अहीरे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार माळीखेल येथील अतिक्रमणाची पाहणी करून नकाशा तयार करत होते. यावेळी गैरअर्जदार मानीक नामदेवराव वाघ हा घटनास्थळी आला व “तुम्ही येथे कोणत्या आदेशाने आला” अशा शब्दांत संताप व्यक्त करत त्यांना अडवले. यानंतर मानीक वाघने रवी पारस्वर यांना अश्लील शिवीगाळ करत चापटा-बुक्यांनी मारहाण केली तर रचना सहाय्यक अहीरे यांच्या मोबाईलचा व्हिडिओ काढत असल्याचे कारण देत तो मोबाईल हिसकावून फेकून दिला. त्यामुळे सुमारे दोन हजार रुपयांचे नुकसान झाले.

इतकेच नव्हे तर मानीक वाघने अहीरे यांना तलवारीने ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे. या संपूर्ण घटनेनंतर नगराध्यक्षांनी स्वतः स्थळ पाहणी करून पोलिसात तक्रार नोंदवली. सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करणे, मारहाण व धमकी देणे याबाबत जळगाव जामोद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!