लोणार (हॅलो बुलढाणा) लोणार तालुक्यातील भुमराळा येथील शेतकरी संतोष डिगांबर भोसले यांच्या 12 गुंठे शेतातील मिरची सीड प्लॉट अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी कापून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले.
सकाळी जेव्हा शेतकरी संतोष भोसले शेतात गेले तेव्हा मिरची ची झाडे बुडातून कापल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी शेतकरी भोसले यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पंचनामा केल असून मिरची प्लॉट कापून टाकणाऱ्याचा शोध घेत आहेत. शेतकरी संतोष भोसले यांनी आपल्या 12 गुंठे शेतात शेड नेट मध्ये मिरचीचां सीड प्लॉट लागवड केला होता.जवळपास 650 झाडाची लागवड केलेली असताना त्याचे क्रॉसिंग सुरू होते. काही दिवसांनी हातात उत्पन्न सुद्धा येणार होते. मात्र कुणीतरी व्यक्तीने विळ्याच्या सहाय्याने संपूर्ण मिरची प्लॉट कापून टाकला आहे. त्यामुळे त्यांचे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.