बीबी (हॅलो बुलढाणा) नजीकच्या चिखला येथील शेतकरी पुत्र एकनाथ वाघ यांना जागतिक कीर्तीच्या हार्वर्ड विद्यापीठात ‘पब्लिक पॉलिसी’ शिक्षणासाठी प्रवेश मिळाल्याबद्दल राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एकनाथ वाघ यांनी शिक्षण घेतले. प्राथमिक शिक्षण जि. प. शाळेतून तर पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. गत तीन वर्षांपासून त्यांचा परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याकरिता संघर्ष सुरु होता. मात्र शिष्यवृत्तीच्या काही तांत्रिक कारणामुळे थोडक्यात संधी हुकली. मात्र त्यांनी हिम्मत हारली नाही. अखेर यंदा त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आणि हार्वर्डमध्ये प्रवेश मिळाला.
एकनाथ वाघ यांच्या जिद्द आणि मेहनतीचे कौतुक करीत संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके, संस्थाध्यक्षा मालती शेळके यांच्या मार्गदर्शनात मेहकरचे विभागीय व्यवस्थापक गोविंद येवले यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा बीबी शाखेमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी स्थानिक संचालक गोविंदराव राठोड, खातेदार ज्ञानेश्वर कुहीटे, डहाके मामा, शाखा व्यवस्थापक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.